राज ठाकरेंना परळी कोर्टाकडून ५०० दंड; सुनावणी नंतर वॉरंट रद्द

लोकगर्जनान्यूज
बीड : परळी कोर्टाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यामुळे ते आज परळी कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टाने त्यांना ५०० दंड करुन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले.
आज बुधवारी ( दि. १८ ) राज ठाकरे मुंबई येथून हेलिकॉप्टरने परळीत सकाळी साडेदहा वाजता दाखल झाले. गोपीनाथ गडावरील हेलिपॅड वर लॅंड झाल्यानंतर प्रथम त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर वाहनाने परळी कोर्टात हजर झाले. सन २००८ च्या एका प्रकरणात राज ठाकरे यांना परळी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या पुर्वीही वॉरंट जारी करण्यात आले होते. तेव्हां ते कोर्टात हजर होऊ शकले नव्हते. आज ते स्वतः हजर झाले. यावेळी युक्तिवाद करताना राज ठाकरे यांच्या वकीलाने पहिल्या वेळी कोरोनामुळे हजर रहात आले नाही तर, दुसऱ्या वारंट वेळी ते आजारी होते. यामुळे कोर्टात हजर रहाता आले नाही. हे युक्तीवाद मान्य करून कोर्टाने ५०० रु. दंड केला. अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. याची पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.असे वृत्त मटाने दिलं आहे.
*कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
राज ठाकरे आज परळी येथे येणार असल्याने शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आले होते. तसेच शहरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यामुळे मनसैनिकांत उत्साह दिसून आला.