युसुफवडगाव ठाणे हद्दीत गांजाची शेती; पोलिसांकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात मिरचीच्या पिकात गांजा लावण्यात आल्याची माहिती एएसपी पंकज कुमावत यांना मिळाली. त्यावरून छापा मारला असता गांजाची ९ झाडे मिळून आली असून जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील चिंचपूर येथे एका शेतकऱ्याने मिरचीच्या पिकात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती एएसपी पंकज कुमावत यांना मिळाली. या माहिती वरुन त्यांनी युसुफ वडगाव पोलीस व पथकाला सोबत घेऊन बुधवारी ( दि. ७ ) सायंकाळी सदरील ठिकाणी छापा मारला, यावेळी मिरचीच्या पिकात पाच ते सहा फुट उंचीचे डेरेदार असे गांजाची ९ झाडे मिळून आली. याचे वजन २४ किलो ८३० ग्रॅम वज किंमत १ लाख २४ हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाणे प्रभारी योगेश उबाळे यांच्या फिर्यादीवरून शेतकरी सत्यपाल ग्यानबा घुगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने केज व धारुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.