क्राईम
अज्ञात वाहनाची धडक दुचाकीस्वार जागीच ठार; बीड-मांजरसुंबा रस्त्यावरील घटना

लोकगर्जना न्यूज
बीड : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मंझेरी फाटा येथे घडली आहे.
गणेश गोपाळराव मोरे रा. लिंबागणेश ( ता. बीड ) असे अपघातातील मयताचे नावं आहे. ते दुचाकी क्रमांक एम.एच. २३ एस ००३४ यावर बीड येथून गावाकडे लिंबागणेश येथे जाताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंझेरी फाटा येथे अज्ञात वाहनाने गणेश मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्यांनी मार लागून ते जागीच ठार झाले. लिंबागणेश परिसरात गणेश मोरे यांना कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे.