मूकनायक दिना निमित्त आदर्श पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

केज : पत्रकारिता क्षेत्रातील नामवंतांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन मूकनायक दिना निमित आदर्श पत्रकार संघ केज यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात जेष्ठ पत्रकार सर्वोत्तम गावरस्कर, सुशील कुलकर्णी, परमेश्वर गित्ते, अनिल वाघमारे, दत्ता देशमुख, अविनाश मुडेगावकर आणि सुशील देशमुख यांचा समावेश आहे.
आदर्श पत्रकार समितीच्या वतीने मागील २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कामगिरी करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देवुन गौरव करण्यात येतो. त्या निमित्त आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जेष्ठ पत्रकार शिवदास मुंडे, प्रा. हनुमंत भोसले, विजयराज आरकडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख, सुहास चिद्रवार, गौतम बचुटे, धनंजय घोळवे, महादेव काळे, प्रकाश मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार सर्वोत्तम गावरस्कर हे काम करीत आहेत. त्यांना आदर्श पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा जिवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. तसेच वेगवेगळ्या दैनिकांत काम केलेले आणि सध्या ॲनालायझर या वेब पोर्टलच्या माध्यमातून चालू घडामोडीवर प्रखर आणि सडेतोड मत व्यक्त करणारे सुशील कुलकर्णी यांना स्व. सुनील देशमुख यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा निर्भीड पुरस्कार जाहीर आहे. दै. वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते यांना आदर्श संपादक पुरस्कार दिला जाणार आहे. पोर्टलच्या माध्यमात वेगळेपण ठेवणारे दै. डोंगराचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांना आदर्श पोर्टलचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर पत्रकार दत्ता देशमुख, अविनाश मुडेगावकर आणि सुशील देशमुख यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
मूकनायक दिनाचे औचित्य साधून लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तींचे आदर्श पत्रकार संघाने कौतुक केले आहे.