मिशन वात्सल्य परळी तालुका समीतीचा कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांचा महामेळावा

परळी वै./प्रतीनिधी
दि. ०७ डिसेंबर २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी मा.नम्रता चाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मा. तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या अध्यक्षतेखाली मिशन वात्सल्य समितीचा महामेळावा बैठक तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाली.
सोमवार ०७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीस उपविभागीय अधिकारी मा नम्रता चाटे मॅडम आणि तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी मार्गदर्शन केले . परळी शहरातील व तालुक्यातील विधवा महिला व अनाथ बालके यांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासंदर्भात सर्व विभागांना उपविभागीय अधिकारी मा नम्रता चाटे मॅडम आणि तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सुचना दिल्या.
या बैठकीस नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी बी.यू. रोडे, महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी ए. एन.मन्सुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी , पंचायत समिती कार्यालय अधिक्षक लव्हरीकर , नगर परिषद स्वच्छता निरिक्षक , तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी आघाव, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय बी. आर. शेरेकर, शेख आखिब, सामाजिक कार्यकर्ते शेख मुकरम ,मिलिंद घाडगे, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती च्या तालुका समन्वयक तथा वात्सल्य समिती सदस्या उषाताई पाळवदे आदी जण उपस्थित होते.