महिला महाविद्यालयाची खेळाडू वैभवी बिरादारची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाची खेळाडू वैभवी बिरादार हिची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महिला महाविद्यालयाची खेळाडू वैभवी बिरादार हिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कबड्डी प्रशिक्षणासाठी निवड होऊन तिच्या तेथील कामगिरीमुळे विद्यापीठाच्या संघात समावेश होऊन आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली.
विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. बडवणे यांनी दि. २० डिसेंबर रोजी आदेश निर्गमित करून विद्यापीठाचा महिला कबड्डी संघ घोषित केला आहे. या संघात वैभवी बिरादारचा समावेश झाला आहे.
२५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये संपन्न होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी हा संघ रवाना झाला असून या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आहे.
वैभवी बिरादार हिला प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक मा. राज्यमंत्री मा. श्री. शिवाजीरावदादा पंडित, अध्यक्ष मा. श्री. अमरसिंह पंडित, सचिव मा. श्री. जयसिंग पंडित, युवा नेते मा. श्री. विजयसिंह पंडित, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद गोरकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.