शिक्षण संस्कृती

राधिका बजाज (लोहिया) यांना पीएचडी ( PHD ) प्रदान

अंबाजोगाई : येथील सौ. राधिका सुरज बजाज (लोहिया) यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील वाणिज्य विभागात पीएचडी ( PHD ) पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. रेश्मा डोईफोडे, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आॕन लाइन खरेदी संदर्भात विशेषत: नांदेड जिल्ह्यातील ग्राहकांच्या प्रवृत्तीचा अभ्यास या विषयावर संशोधनाचे कार्य पूर्ण केले.
राधिका सुरज बजाज यांनी यापूर्वी एमफील, जीडीसीए व सेट परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. तसेच त्यांनी नांदेड येथील यशवंत महाविद्यालय, पिपल्स महाविद्यालयात व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. यासाठी त्यांना सासरे बालाप्रसाद बजाज व वडिल राजकुमार लोहिया यांचे पाठबळ लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »