मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस

आईने पोटच्या मुलाला विहीरीत फेकले
लातूर : आईने पोटच्या दोन वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . मन हेलावून टाकणारी ही दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातील राठोडा ( ता.निलंगा ) गावात आज उघडकीस आली. वेडाच्या भरात आईने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
माया व्यंकट पांचाळ ( रा. राठोडा ता. निलंगा ) असे दुर्दैवी मातेच नाव असून अनेक दिवसापासून त्याच मानसिक संतुलन बिघडल्याने वेडी झाली.तर, पती लातूर येथे एका खाजगी कंपनीत वॉचमन म्हणून नौकरी करतो . आई आणि दोन वर्षाचा मुलगा राठोडा येथे गावाकडे राहतात . वेडाच्या भरात आईने आपल्या दोन वर्षांच्या पोटच्या मुलास पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत फेकून घराकडे निघून गेली . मुलाचं प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचं लोकांना आढळून आल्यानंतर घटना उघडकीस आली. गावकऱ्यांनी निलंगा पोलीसांना माहिती दिली असता उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे व पोलिस निरिक्षक बाळासाहेब शेजाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. मुलाचे प्रेत पाण्याबाहेर काढून निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कारासाठी प्रेत वडील व्यंकट पांचाळ यांच्या ताब्यात दिले. आरोपी मातेस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.