कोरोना सुसाट! राज्यात नवे नियम लागू…..पहा काय बंद… काय सुरू

मुंबई : बऱ्यापैकी आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा सुसाट सुटल्याने चिंतेचे वातावरण आहे. आठवड्याभरात राज्याने ४० हजार तर मुंबईने २० हजाराचा आकडा क्रॉस केला. सुसाट सुटलेला कोरोनाल रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध घोषित केले आहेत.याची अंमलबजावणी उद्या पासून करण्यात येणार आहे.
हे रहाणार बंद?
शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारी पर्यंत बंद?
खेळांची मैदाने, उद्यान, सर्व पर्यटनस्थळे?
स्विमिंग पूल, व्यामशाळा ( जिम ), स्पा?
पार्क, गडकिल्ले, संग्रहालय, प्राणीसंग्रहालय पुढील आदेश येईपर्यंत बंद?
विवाह,अंत्यसंस्कारासाठी हे नियम?
विवाह सोहळा, राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यासाठी ५० लोकांना परवानगी, तर अंत्यसंस्कारावेळी २० लोकांना उपस्थित रहाता येणार.
हे सुरू रहाणार?
चित्रपटगृह, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेनं सुरु ५० टक्के क्षमतेनं सलून चालविण्याची परवानगी
हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु
मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
लसवंतांना सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवासाला परवानगी
खासगी कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुरू राहणार?