भाजपा कार्यकर्ता शेजुळ हल्ला प्रकरणी आ.सोळंके व त्यांच्या पत्नीसह आदींवर गुन्हा दाखल

लोकगर्जनान्यूज
माजलगाव : येथील भाजपा कार्यकर्ता अशोक शेजुळ यांच्यावर मंगळवारी ( दि. ७ ) अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी आहेत. या हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके, पत्नी मंगल सोळंके यांच्यासह आदींवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणी मधील गैर व्यवहाराची तक्रार अशोक शेजुळ यांनी केलेली आहे. या तक्रारीमुळे माझ्यावर प्रकाश सोळंके यांनी हल्ला घडवून आणला असल्याची तक्रार शेजुळ यांनी केली. त्यावरून आमदार सोळंके व त्यांच्या पत्नी मंगल प्रकाश सोळंके यांच्यासह आदींवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काल झाला हल्ला
अशोक शेजुळ काल मंगळवारी ( दि. ७ ) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्कुटी वरुन चालले होते. यावेळी पाठी मागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे शेजुळ यांचे पाय व हात फॅक्चर झाले आहे.