भरदिवसा घरफोडी;रोख रक्कमसह लाखोचा ऐवज लंपास

बीड : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत घुसले. कपाटातील रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने असा १ लाख ९३ हजार ३०० रू. ऐवज लंपास केल्याची घटना तळेगाव येथे शुक्रवारी ( दि. २४ ) दुपारी साडेबारा ते तीनच्या दरम्यान घडली. भरदिवसा घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बीड तालुक्यातील तळेगाव येथील दत्तात्रय जगन्नाथ राऊत परिवारासह शुक्रवारी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते . घरी कोणीच नसल्याने घराला बाहेरुन कुलुप होते. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने लोक शेतात जातात. त्यामुळे १० ते ११ च्या नंतर गावागावात शुकशुकाट असतो. गावातील कमी वर्दळ घर बंद असल्याने कोणीही नसल्याचा अंदाज आल्याने कुलूप तोडून चोरटे घारात घुसले. आतील कपाटातील तूरीचे आलेली रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असे एकूण १ लाख ९३ हजार ३०० रू. ऐवज लंपास केला. याप्रकरणी दत्तात्रय राऊत यांच्या तक्रारीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.