बैठक सुरू असताना न बोलावता एक पाहुणा टपकला अन् सर्वांचीच पाचावर धारण बसली

लोकगर्जनान्यूज
बीड : आरोग्य कर्मचाऱ्यांची मासिक बैठक सुरू होती. येथे अचानक न बोलावता एक पाहुणा टपकला याला पाहून डॉक्टर,कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. असा पाहुणा कोण आहे त्यासाठी पुर्ण बातमी वाचा
धामणगाव ( ता. आष्टी ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी ( दि. ३१ ) दुपारी सर्व कर्मचाऱ्यांची मासिक बैठक सुरू होती. यावेळी सर्व आपलं अहवाल, कामे यावर चर्चा करताना बैठकीच्या हॉलमध्ये भलामोठा कोब्रा घुसला याला पहाताच सर्वांची पाचावर धारण बसली. सर्वच घाबरून गेले. कोब्रा म्हणजे आपल्याकडे आढळणारा विषारी साप, याची सर्वांनाच ओळख त्यामुळे मारण्यासाठी कोणी पुढे धजेणा निघून जाण्याची वाट पाहिली तो जायचे नाव घेईना. मग शेवटी सर्पमित्र अर्जुन चौधरी यांना फोन केला. माहिती मिळताच चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन त्यास पकडून बाहेर नेऊन सोडले.