बीड मध्ये तरुणाचा मृतदेह व बाजुलाच घातक शस्त्र आढळल्याने खळबळ!

लोकगर्जना न्यूज
बीड शहरात आज ( दि. ८ ) सकाळी संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला आहे. जवळच पिस्तूल हा घातक शस्त्र आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतीत हत्या की, आत्महत्या अशी चर्चा सुरू आहे. घटनास्थळी शिवाजी नगर पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
अक्षय भानुदास भांडवले असे मयत तरुणाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. स्वराज्य नगर परिसरात अक्षयचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी पिस्तूल आढळून आला असून तो जप्त केला आहे. मृतदेह आणि पिस्तूल यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबतीत पोलीसांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. मृतदेह आढळल्याची बातमी शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.