भवताली
शिवाजी ( दादा ) कोपले यांचे निधन; आडस येथे होणार अंत्यविधी

आडस : येथील शिवाजी ( दादा ) कोपले ( वय ८८ वर्षं ) यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवार ( दि. २१ ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
शिवाजी कोपले हे दादा म्हणून परिचित होते. एक उत्तम शेतकरी व व्यवसायिक, सतत हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने प्रत्येक संपर्कातील व्यक्तीला दादा आपलेसे वाटायचे. ते अनेक वर्षांपासून अंबाजोगाई येथे स्थायिक झाले परंतू मुळ गाव आडसशी असलेली नाळ शेवटपर्यंत तुटु दिली नाही. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात येणार आहे.