क्राईम

बीड-परळी महामार्गावर पुन्हा अपघात; एक ठार दोन गंभीर

अप्पे रिक्षा व माल वाहतूक छोट्या पेम्पोची धडक

 

लोकगर्जना न्यूज

बीड येथून वडवणीच्या दिशेने जात असलेला अप्पे रिक्षा व समोरुन येत असलेला अशोक लिलॅंड चा मालवाहतूक छोटा टेमपोचा अपघात झाला. यामध्ये एक १७ वर्षांचा मुलगा जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी बीड-परळी महामार्गावर पोखरी पाटीजवळ घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर मैंदा येथे कार व दुचाकीच्या धडकेत एक तरुण ठार झाला. वाढते अपघात पहाता या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

ओमकार महादेव क्षीरसागर ( वय १७ वर्ष ) रा. पिंपरखेड ( ता. वडवणी ) असे मयताचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास बीड येथून प्रवासी घेऊन अप्पे रिक्षा क्रमांक एम.एच. २३ एच ७१३१ हा वडवणीच्या दिशेने जात हता. दरम्यान पोखरी पाटीजवळ आला असता अचानक टायर निखळला व तेव्हांच ओवरटेक करत असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवर रिक्षा आदळला. रिक्षा आदळताच तिघे खाली फेकले गेले. यातील ओमकार यास जबर मार लागून जागीच ठार झाला. दोघे गंभीर जखमी झाले. जखमींची नाव समजु शकली नाहीत. अपघातात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत करत जखमींना बाजुला काढलं. १०८ ला फोन करुन रुग्णवाहिका बोलावून घेतली. जखमींना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले. पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. अपघातानंतर बराच वेळ वाहतूक बंद राहिल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीसांनी नंतर वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »