वीजेच्या रोहित्रवरील स्पार्किंगची ठिणगी पडून ऊस जवळा; केज तालुक्यातील घटना

केज : शेतातील डीपीवरच्या डीओच्या सपार्किंगमुळे केज तालुक्यातील साळेगाव येथे शेतकऱ्यांच्या उभ्या उसाला आग लागून नुकसान झाले.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथे गांजी रोड लगतच्या शेतातील अक्षय महादेव वरपे व सविता विलास वरपे दोघांचा एक एकर क्षेत्रातील ऊस जळाला आहे ऊस आणि त्यातील ठिबक संच जळून नुकसान झाले.
दि. १ मार्च मंगळवार रोजी दुपारी १२:३० वा. च्या दरम्यान साळेगाव ता. केज येथील गांजी रस्त्या लगतच्या शेतातील डीपीवरच्या डिओची स्पार्किंग होऊन त्याची ठिणगी ऊसावर पडल्याने पेट घेतला. या आगीत अक्षय महादेव वरपे व सौ. सविता विलास वरपे यांचा एक एकर उभा ऊस आणि त्यातील ठिबक संच जळून नुकसान झाले आहे.
नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांची तत्परता
या घटनेची माहिती पत्रकार गौतम बचुटे यांनी नगराध्यक्षा सिताताई बनसोड यानी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी कळविताच त्यांनी तातडीने हालचाल करीत अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पाठविली. तसेच वरिष्ठ वीज तंत्रज्ञ रमण डिकले यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केला.