क्राईम
ऊसाच्या ट्रॅलीला धडक तरुण ठार:केज-मांरसुंबा रस्त्यावरील घटना

लोकगर्जनान्यूज
केज : ऊसाचा ट्रॅक्टर समोर न दिसल्याने ट्रॅलीवर पाठीमागून जोरदार धडक बसून दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना केज-मांजरसुंबा रस्त्यावर मस्साजोग येथील पेट्रोल पंपासमोर रविवारी ( दि. २७ ) सायंकाळी घडली आहे.
आकाश राजाभाऊ नेहरकर रा. पिसेगाव ( ता. केज ) असे मयत तरुणाचे नाव आहे. आकाश हा सायंकाळी मांजरसुंबा येथून दुचाकी क्रमांक एम. एच. ४४ जे ७४३५ वरून केजच्या दिशेने येत होता. दरम्यान मस्साजोग येथे देशमुख पेट्रोल पंपाजवळ केज येथील कारखान्यावर ऊस घेऊन जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २५ जी २२८१ च्या ट्रॅलीला दुचाकी पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार आकाश नेहरकर गंभीर जखमी झाला. यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.