धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या;पाण्याच्या टाकीवरुन घेतली उडी

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असून याच मागणीसाठी तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून घोषणा देत चक्क उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गिरवली येथे शुक्रवारी ( दि. २७ ) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपला असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावात आंदोलन सुरू झाली. याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून शत्रुघ्न काशीद शुक्रवारी ( दि. २७ ) गावातील पाण्याच्या टाकीवर चढला मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी सुरू केली. तसेच जरांगे पाटील यांना बोलायचं असल्याचीही इच्छा व्यक्त केली. या घटनेची संबंधित पोलीसांना माहिती मिळाली माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सदरील तरुणाने काहीएक ऐकून न घेता पाण्याच्या टाकीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बीड जिल्ह्यात कळताच खळबळ उडाली आहे. आरक्षण प्रश्नी मराठा तरुण टोकाचं पाऊल उचलत असल्याने असे टोकाचे निर्णय घेण्यापासून तरुणांना रोखणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.