क्राईम

बीड जिल्ह्यात अपघात थांबण्याचे नाव घेत नाही आज पहाटे मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर भीषण अपघात

 

बीड : पिक अप व ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा-पाटोदा दरम्यान लिंबागणेश जवळ घडली आहे. जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच असून, केज व धारुर येथे दोन दिवसांत तीन अपघात घडले आहेत. या तिन्ही अपघातात तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यानंतर आज सकाळी मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर लिंबागणेश येथील महावितरण कार्यालयासमोर अपघाताची घटना घडली आहे. पिक अप क्रमांक एम.एच. २४ एबी ६४६० व ट्रॅक्टरची धडक होऊन घडलेल्या अपघातात
महादेव जाधव रा. लिंबागणेश यांच्यासह पिक अप मधील बबन सोपान सुर्यवंशी ( वय ५० वर्ष ),कुंडलिक गंगाराम सुर्यवंशी ( वय ६० वर्ष ) ,कांशीराम सुर्यवंशी ( वय ५० वर्ष ),चंद्रकांत विश्वंभर माने ( वय ३८ वर्ष ) अनुसया अच्युत सुर्यवंशी,मंडुबाई केरबा गायकवाड (वय ६० वर्ष ),सिंधुबाई धमाजी माने ( वय ४५ वर्षं ) सर्व रा उदगीर ( जि. लातूर ) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथे पाठविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »