आपला जिल्हाराजकारण

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा कौल स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात?

लोकगर्जनान्यूज

बीड : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणी सकाळी १० पासून सुरू झाली. यानंतर अर्ध्या ते पाऊण तासात निकाल हाती येणे सुरू झाले. यामध्ये बहुतांश ठिकाणी स्थानिक स्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा कौल दिसून येत आहे. सरपंच पदाची थेट जनतेतून निवड असल्याने त्या भवतीच निवडणूक फिरल्याचे दिसत असून, अनेक ठिकाणी सरपंच एकाचा व सदस्य दुसऱ्याच पॅनलचे आल्याचे दिसून येत आहे. तर नवगण राजुरी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात आमदार संदीप क्षीरसागर यशस्वी ठरले आहेत. तर परळी मतदारसंघात बहीण भावात काटे की, टक्कर दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यातील एकूण ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या होत्या. यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. ६५७ ग्रामपंचायतीसाठी रविवारी ( दि. १८ ) मतदान पार पडले. आज मंगळवारी ( दि. २० ) सकाळी १० पासून प्रत्येक तालुक्यात ६५७ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. जवळपास बरेच निकाल हाती आले आहेत. यामध्ये मात्र स्थानिक पातळीवरील प्रस्थापितांना धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येतं आहे. ही एक प्रकारे मतदारांमध्ये आलेली जागृतीचा संदेश असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च वाढल्याचे दिसून आले. मतदार आणण्यासाठी खूप कष्ट घेतले गेले. यामुळे अख्या महाराष्ट्रात शनिवारी रात्री वाहतूक कोंडीच्या बातम्या आहेत. परंतु अद्याप पुर्ण निकाल हाती आले नसून तासभर पुर्ण चित्र स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »