बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा!

लोकगर्जनान्यूज
बीड : राज्यातील ७७५१ आणि बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा प्रोग्राम आज बुधवारी ( दि. ९ ) जाहिर झाला. यामुळे उद्यापासून राजकीय वातावरण तापणार असून, निवडणूकांचा धुरळा उडणार आहे.
गावपातळीवरील कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणूकीची प्रतिक्षा होती. ती आज संपुष्टात आली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा प्रोग्राम जाहीर झाला आहे. यासाठी दि. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल घोषीत करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत राहील. छाननी ५ डिसेंबर, उमेदवारी अर्ज मागे व चिन्ह वाटप ७ डिसेंबर असे जाहीर करण्यात आले आहे.
तालुक्यात निहाय ग्रामपंचायत
अंबाजोगाई ८३
आष्टी १०९
बीड १३२
धारुर ३१
गेवराई ७६
केज ६६
माजलगाव ४४
परळी वै. ८०
पाटोदा ३४
शिरुर का. २४
वडवणी २५