बीड जिल्हा आणि ओमिक्रॉनमध्ये मांजरा नदीचे पात्र केज तालुक्याचं टेन्शन वाढलं

कळंब : दिवसेंदिवस ओमिक्रॉन व्हेरियंट पाय पसरत असून कांही दिवसांपूर्वी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत. आज कळंब तालुक्यातील मोहा येथे परदेशातून आलेले बाप – लेकास ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. आहे . कळंब म्हणजे बीड जिल्ह्याच्या सिमेवरील शहर असून मधे केवळ मांजरा नदीचे पात्र आहे. केजला लागून असल्याने केजकरांचे टेन्शन वाढलं असल्याचे बोलले जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहा ( ता.कळंब ) येथील एक कुटूंब घाना देशात स्थायिक आहे. तेथेही ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने सदर कुटूंब चार – पाच दिवसांपूर्वी मायदेशी म्हणजे भारतात पोचला. त्यांची दिल्लीत विमानतळावर तपासणी करण्यात आली. त्यावेळी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. आले होते .ते मोहा येथे आपल्या गावी आले . मोहा येथे आल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये बाप-लेकाचं अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करुन उपचार सुरु केले. ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी सॅम्पल पुणे येथे पाठविण्यात आला. तो अहवाल गुरुवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला . त्यानुसार बाप लेकास ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे . यामुळे कळंब तालुक्यात एकच खळबळ माजली. तर, उस्मानाबाद जिल्ह्यातील. ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित रुग्णांची संख्या पाचवर गेली.