बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील, इंटरनेट रहाणार १० तास बंद,२८ ठिकाणी नाकाबंदी

लोकगर्जनान्यूज
बीड : मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला असून शांततेचे आवाहन करुनही अंबड तालुक्यात एक बस जाळल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून बीड-जालना बॉर्डर सील करण्यात आले. तसेच दक्षता म्हणून जिल्हा भरात २८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. बस सेवा काही ठिकाणी बंद करुन बीड, जालना, औरंगाबाद बस पुर्ण बंद आहे. या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.
यापुर्वीची जाळपोळीची घटना पहाता सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने खबरदारीचे पाऊले उचलली असून, बीड जिल्ह्यातील २८ ठिकाणी कडक नाकाबंदी लावली आहे. येणारी जाणारी वाहने तपासले जात आहे. बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील करण्यात आली. अफवा पसरवू नये म्हणून इंटरनेट सेवा १० तासांसाठी बंद करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही १०० टक्के बंद होईल. काही अनुचित प्रकार नाही घडला तर १० तासानंतर इंटरनेट सेवा सुरू होईल. अन्यथा याचा वेळ वाढु शकतो. तसे शांततेला बाधा पोहोचेल असे कृत्य कोणीही करु नये तसेच जवळ शस्त्र अथवा ज्वलनशील पदार्थ बाळगु नये असे आवाहन बीड पोलीसांनी केले.