बीड जवळ कारचा भीषण अपघात तीन ठार एक जखमी

लोकगर्जनान्यूज
बीड : येथे लग्नासाठी येत असलेल्या मित्रांच्या कारला घोसापूरी शिवारात भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. जखमीला बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरील घटना आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्तांना मदत केली. सर्व मयत हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.
धीरज गुणदेजा ( वय ३० वर्ष ), रोहन वाल्हेकर ( वय ३२ वर्ष ), विवेक कांगुने ( वय ३२ वर्ष ) अशी मयतांची नावे असून आनंद वाघ हा तरुण गंभीर जख्मी आहे. हे सर्वजण चार चाकी वाहने नेवासा ( जि. अहमदनगर ) येथून मित्राच्या लग्नाला जात होते. दरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पेंडगाव जवळील घोसापूरी शिवारातील हॉटेल प्यासा जवळ कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की , कारचा चक्काचूर झाला असून आतील तिघांजा जागीच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उतरून पलट्या खाल्याची चर्चा आहे. अपघात घडल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.