बीडमध्ये प्रथमच ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबई,पुणे येथे मिळणारी शस्त्रक्रिया सेवा बीडमध्ये उपलब्ध

लोकगर्जनान्यूज
बीड : शहरातील पॅराडाईज हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्दीक अहेमद यांनी शुक्रवारी (दि.२५) त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. ही बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण मानलं जातं आहे. आता या शस्त्रक्रियेसाठी मुंबई,पुणे येथे जाण्याची गरज नाही. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया जीवनदायी योजनेतून करण्यात आली आहे. या यशस्वी शस्त्रक्रिया बद्दल प्राउडऑफ डॉक्टर सिद्दीक अहेमद साहेब असे म्हटले जात आहे.
बीड जिल्हा हा मागास म्हणून ओळखला जातो. तसेच मागील काही दिवसांपासून जिल्ह्याची विविध घटनांमुळे खूप बदनामी झाली असून, जिल्ह्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन नकारात्मक बनविला जात आहे. शुक्रवारी (दि.२५) मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. ही वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने आहे. शहरातील मसर्रत नगर भागातील मोंढा रोडवरील जिजामाता चौकात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.सिद्दीक अहेमद यांचे पॅराडाईच हॉस्पिटल आहे. या माध्यमातून बीडकरांना हृदयरोग सबंधि सुविधा देतात. डॉ. सिद्दीक अहेमद हे हृदयरोग रुग्णांसाठी मोठे आधार ठरत आहेत. त्यांनी हृदयरोग संबंधित ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी या शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. पण ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णाला मुंबई, पुणे येथे जावे लागत असे, आधीच ही खर्चिक शस्त्रक्रिया आणि त्यात पुणे, मुंबई सारख्या शहरात रहाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा खर्च आणि त्रास हा वेगळाच आहे. यामुळे सामान्य माणसाला मोठा संघर्ष करावा लागतो. पण आता ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नसून ही सुविधा बीड येथे पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. बीडच्या इतिहासात प्रथमच काल शुक्रवारी (दि.२४) डॉ. सिद्दीक अहेमद यांनी त्यांच्या पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. ही बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी त्यांनी विशेष ऑपरेशन थिएटर उभे केले तर अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध केली आहे. यामुळे हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना आता तातडीने उपचार मिळणार आहेत. तसेच ही पहिलीच ओपन हार्ट शस्त्रक्रिया शासनाच्या जीवनदायी आरोग्य आरोग्य योजनेतून मोफत झाली आहे. यामुळे पॅराडाईज हॉस्पिटलचे डॉ. सिद्दीक अहेमद आणि त्यांची टीम डॉ. महेश केदार, डॉ. मोहम्मद सिद्दीक, सय्यद नासेर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.