Beed- स्कॉर्पिओ अडवून 5 लाख लुटले; चार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

लोकगर्जनान्यूज
बीड : पुणे येथून गावाकडे परत येताना अज्ञात आरोपींनी ऊसतोड मुकदमाची स्कॉर्पिओ अडवून गळ्यातील सोन्याची साखळी व रोख रक्कम असा एकूण 5 लाखांचा ऐवज काढून घेतला. ही घटना बुधवारी ( दि. 27 ) रात्री महासांगवी जवळ घडली आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ऊसतोड मजुर दरवाढसाठी आयोजित बैठकीसाठी गेलेले मुकादम तात्यासाहेब दगडु हुले रा. ढाळेवाडी ( ता. पाटोदा ) हे बैठक संपल्यानंतर आपल्या गावाकडे स्कॉर्पिओ क्र. एम. एच. 23 ई 9925 ने येत होते. दरम्यान साकत रोडवर महासांगवी जवळ आज्ञात चार जणांनी वाहन अडवून हुले यांच्या गळ्यातील 10 तोळ्यांची सोन्याची साखळी व 2 लाख रुपये रोख असा ऐवज धाक दाखवून जबरदस्तीने काढून घेतला. याप्रकरणी तात्यासाहेब हुले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.