प्राथमिक आरोग्य केंद्र रूई धारूर येथील समस्या तात्काळ सोडवा-प्रा.ईश्वर मुंडे

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
किल्ले धारूर : तालुक्यातील रुई धारुर प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गैर सोयी आहेत.रूग्ण वाहीकेस डीझेल ची तरतूद नाही,कर्मचारी नाहीत, वेतनासाठी डी. डी.ओ. कोड नाही,आवश्यक रूग्ण सेवा मिळत नाही,रूग्ण कल्याण समिती कार्यान्वीत नाही अशा अनेक तक्रारी परिसरातील नागरीकांनी राष्ट्रवादीचे नेते प्रा.ईश्वर मुंडे यांच्या कडे केल्या होत्या.
त्या नुसार प्रा. मुंडे यांनी आरोग्य केंद्रास भेट दिली असता तेथे अनेक गैरसोयी असल्याचे निदर्शनास आले.
याची दखल घेऊन वरिष्ठांशी पाठपुरावा केल्यामुळे आठ कर्मचारी रूजू झाले आहेत.परंतू गैरसोयी कायम आहेत. यावर मार्ग काढून परिसरातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गित्ते यांना निवेदन देवून येथील समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र रूई येथील सर्व समस्यांचा आढावा घेवून मार्ग काढण्यासाठी आपण स्वत:आरोग्य केंद्रांस भेट देवून आढावा बैठक घेईल असे अश्वासन डॅा.गित्ते जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्याचे प्रा.ईश्वर मुंडे यांनी सांगितले आहे.