पोलीस अधिक्षकांच्या पथकाची केज तालुक्यात कारवाई; सात जुगारी पकडले

लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आच दुपारी ४ सुमारास पत्याच्या क्लबवर छापा मारला. यावेळी सात जुगारी जागीच पकडले तर १ लाख ९ हजार ८२० रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ( दि. १८ ) दुपारी ४:१० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील बोरीसावरगाव येथे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पत्याच्या क्लबवर छापा मारला. यावेळी सात जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम १७ हजार ३२० रु. , दोन दुचाकी, पाच मोबाईल असा एकूण १ लाख ९ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील जुगाऱ्यांची नावं समजु शकली नाहीत. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनि विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप ,पोलीस अमलदार किशोर गोरे, चालक पोलीस अमलदार गणपत पवार यांनी केली. बीडच्या पथकाला बोरीसावरगाव येथे पत्याचे क्लब सुरू असल्याचे समजते व ते येथे येऊन छापा टाकतात परंतु स्थानिक पोलीसांना याची खबर ही नस्ते याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.