पोखरी शाळेला जि.प.कडून ५० लाख;. सीईओ अजित पवार यांनी दिली मंजूरी

लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील पोखरी जिल्हा परिषद शाळेला भरभरून अशी ५० लाखांच्या निधीची तरतूद करून त्यास तत्वतः मान्यता दिली. याबाबत सीईओ अजित पवार यांनी ग्रामस्थांना माहिती देताच आनंदाला पारावार उरला नाही.
पोखरी ( घाट ) येथील ग्रामस्थांनी ३२ लाख लोकवर्गणी गोळा करून गावात जिल्हा परिषद शाळेसाठी टोलेजंग इमारत बांधकाम सुरू केले. परंतु इमारतीचे काम पुर्ण करण्यासाठी आणखी पैशांची गरज आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी सीईओ अजित पवार यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळा बांधकाम सुरू केल्याचे ऐकताच कौतुक केले. जिल्हा परिषदेकडून निधीची तरतूद करण्याची तयारी दाखवली होती. या अनुषंगाने आज त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले. बैठकीत येथे आणखी दोन शाळा खोल्या, संरक्षण भिंत, स्वच्छता गृह, नाल्यांवर स्लॅब या कामासाठी तब्बल ५० लाख रुपयांची निधीची तरतूद केली.पोखरी येथील ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. सीईओ अजित पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांचे आभार मानले.