क्राईम
पुन्हा भीषण अपघात;चार ठार, एक जखमी

उस्मानाबाद : शहरापासून १० कि.मी. अंतरावरील अळणी फाट्याजवळ कार आणि कंटेनरचा धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि .३१ ) घडली आहे. मृत लातूर येथील असल्याचे सांगितले जात आहे. जखमी हा कारमधील आहे की, कंटेनर हे समजु शकलं नाही.
कार क्र. एम.एच. २४ ए ए ८०५५ आणि ट्रॅक्टर घेऊन धुळेच्या दिशेने कंटेनर चालले होते. सोलापूर-धुळे महामार्गावर अळणी फाटा येथे भरधाव कार धडकून कंटेनरच्या खाली घुसून झालेल्या अपघातात कारमधील चार जण ठार झाले तर, एक गंभीर जखमी झाले. जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला.