पीक विमा Crop insurance आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी ( sdm ) यांची म्हत्वाची सूचना

लोकगर्जनान्यूज
केज : येथे तहसील कार्यालयात पीक विमा ( Crop insurance ) बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी ( sdm ) शरद झाडके यांनी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून 1 पेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन केंद्र चालकांनी घेऊन नये अशी सूचना केली आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रु पीक विमा ( Crop insurance ) चा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारा महाराष्ट्र हा देशातील पहिलाच राज्य आहे. परंतु 1 विमा असला तरी तो ऑनलाईन भरण्यासाठी 100 रु. द्यावे लागत असल्याची चर्चा आहे . यासाठी अंबाजोगाई उपविभागीय दंडाधिकारी ( sdm ) शरद झाडके यांनी गुरुवारी ( दि. 13 ) 2023-24 हंगाम पीक विमा ( Crop insurance ) आढावा बैठक घेतली. यावेळी सिएससी,व्हिएलई व आपले सेवा केंद्र चालकांना बोलाविण्यात आले. या सर्वांना पीक विमा ( ( Crop insurance ) भरून घेताना प्रति अर्ज एक रुपया पेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांनाकडून घेऊ नका अशी सूचना केली. तसेच यावेळी विमा संदर्भात असलेल्या अडीअडचणी याविषयी चर्चा झाली. भारतीय कृषी विमा कंपनीचे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार अभिजित जगताप,तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे ,कृषी विमा कंपनीचे राहुल चौरे, तालुक्यातील ऑनलाईन केंद्र चालक उपस्थित होते .