आपला जिल्हा

बीडमध्ये अवतरले यमराज!

अर्धवट व खड्डेमय रस्त्यांमुळे वाढते अपघाती मृत्यूच्या निषेधार्थ डॉ. ढवळेंचे आनोखे आंदोलन

लोकगर्जनान्यूज

बीड : जिल्ह्यात अपघाती मृत्यूची वाढत्या घटना याला कारणीभूत असलेले अर्धवट व खड्डेमय रस्ते याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी यमराजाची वेशभूषा करुन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर ‘यमराज स्वागत’ असे अनोखे आंदोलन केले. या आंदोलनानंतर शहरात यमराज अवतरल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

जिल्ह्यातील काही राष्ट्रीय महामार्ग अर्धवट अवस्थेत असून, धुळे-सोलापूर महामार्ग सोडला तर नवीन राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक नाही. कुठं आहे तर त्याचे काम अपूर्ण आहे. अहमदपूर – अहमदनगर रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे. बीड शहरातून जाणारा बायपास ते बायपास रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते खड्डेमय आहेत. यामुळे मागील काही काळा पासून अपघातांच्या घटना व त्यातील मृत्यू वाढले आहेत. अनेक निष्पापांना अपघातात यमराजाचे भक्ष्य व्हावे लागले. अनेक मुले अनाथ झाली आहेत, अनेकांचा आधार हरवला असल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. परंतु याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बीड शहरात शुक्रवार ( दि. २८ ) सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी यमराज स्वागत हे अनोखे आंदोलन करुन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यमराजाची वेशभूषा करून डॉ. ढवळे हे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे नगर रोडवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काळे कपडे, एका हातात गदा, दुसऱ्या हातात तलवार असे हुबेहूब यमराजचा अवतार घेऊन ते रस्त्यावर चालत होते. प्रत्येकजण यमराज आला म्हणून पहात होता. या आंदोलनानंतर शहरात यमराज आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. डॉ. गणेश ढवळे यांचे सामान्य जनतेतून आभार मानण्यात आले. परंतु आतातरी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या यमराज स्वागत आंदोलनात शेख युनूस, सय्यद आबेद, बलभीम उबाळे,राहूल कवठेकर, शेख मुश्ताक, दिपक पवार, अजय सरवदे, मायकल वाघमारे सह आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »