पाली घाटातील डोळ्याचं पारणं फेडणार दृश्य पाहून वाटसरुना फोटो काढण्याचा मोह आवरेना

लोकगर्जना न्यूज
बीड : येथील पाली घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावरुन वाहणारे धबधबे पहाता डोळ्याचं पारणं फेडणार चित्र सध्या आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्यांना फोटो काढण्याचा मोह आवरणे कठीण झाले. येथील काही फोटो काढून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले.
धबधबा म्हटलं की, बीड जिल्ह्यातील सौतडा व कपिलधार येथील धबधबा डोळ्यासमोर येतात. परंतु मागील तीन-चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात दररोज पाऊस पडतो आहे. यामुळे जागोजागी झुळझुळ पाणी वाहत आहे. या पावसामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाली घाटात डोळ्याचं पारणं फेडणार चित्र निर्माण झाले आहे. डोंगर कापून रस्ता तयार करण्यात आला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच डोंगर आणि मधून रस्ता आहे. या दररोजच्या पावसामुळे त्याडोंगरावरुन पाणी खाली कोसळत आहे. त्यांने धबधब्याचे विहंगम दृश्य पाहून येथून प्रवास करणाऱ्यांना सेल्फी व फोटो घेण्याचा मोह आवरणे कठीण झाले आहे. अनेकांनी हा निसर्गाचा सुंदर देखावा आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ( फोटो क्रेडिट डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर)