पाण्याच्या बारीवरुन एकाचे दात पाडले; ६ जणांवर गुन्हा दाखल

लोकगर्जना न्यूज
शेतातील विहीरीच्या पाण्याच्या बारीवरून सहा जणांनी संगणमत करुन लोखंडी गज, दगडाने मारहाण करुन तीन दात पाडल्याची घटना लाडेवडगाव ( ता. केज ) येथे शुक्रवारी (दि. १८ ) सकाळी १० वाजता घडली आहे. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतीत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, त्रिंबक शेप यांना आरोपी १ ) केशव तुळशीराम शेप , २ ) सचिन भागवत शेप याच्या हातात लोखंडी गज , ३ ) नितीन भागवत शेप याच्या हातात कोयता , ४ ) भागवत तुळशीराम शेप याच्या हातात दगड , ५ ) गीता बालासाहेब शेप , ६ ) लता नितीन शेप सर्व रा . लाडेवडगाव ता . केज जि . बीड यांनी संगणमत करुन मारहाण केली. पाणी देण्याची बारी आमची असताना तु का आलास असे आरोपींनी म्हटले असता माझ्या मालकीची विहीर आहे मी पाणी देणार असे म्हणताच मला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी क्रमांक २ याने साक्षीदार त्रिंबक शेप यांना गजाने उजव्या खांद्यावर मारुन जखमी केले तसेच तोंडावर मारुन तीन दात पाडले असून ते गंभीर जखमी आहेत तसेच दुसऱ्या साक्षीदार छाया शेप यांचेही केस पकडून आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. अशी फिर्याद कमलाकर त्रिंबक शेप ( वय ३२ वर्ष ) रा. लाडेवडगाव ता.केज यांनी दिली. त्यावरुन आरोपी १ ) केशव तुळशीराम शेप , २ ) सचिन भागवत शेप याच्या हातात लोखंडी गज , ३ ) नितीन भागवत शेप याच्या हातात कोयता , ४ ) भागवत तुळशीराम शेप याच्या हातात दगड , ५ ) गीता बालासाहेब शेप , ६ ) लता नितीन शेप यांच्या विरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास एएसआय तुपारे हे करीत आहेत.