पांढऱ्या दूधाचा काळा धंदा; जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची कामगिरी

लोकगर्जना न्यूज
रसायनांचा वापर करून दूध उत्पादन करुन स्वतःचे उखळ पांढरे करत पांढऱ्या दूधाचा काळा धंदा करणाऱ्या व जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्याला एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने दणका दिला. बनावट दूध व रसायनासह त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात रसायना पासून दूध तयार करुन तो विक्री करून जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. अशी माहिती गुप्त खबऱ्याने एएसपी पंकज कुमावत यांना दिली. माहिती मिळताच कुमावत यांनी त्यांच्या पथकाला पाठवले या पथकाने नागेशवाडी येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता दूध तयार करताना एकास रंगेहाथ पकडले. तसेच घटनास्थळी पावडर, १६० लिटर दूध असे एकूण ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अप्पासाहेब हरीभाऊ थोरवे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरील कामगिरी विकास चोपने, बाबासाहेब बांगर, म.पो. आशा चौरे, राजु वंजारे, दराडे बालाजी तसेच अन्न भेसळ कार्यालयाचे कर्मचारी यांनी संयुक्त केली. या कारवाईमुळे सामान्य जनतेतून पोलीस प्रशासनाचे आभार मानले जात आहे.