परळीत तूर बडवल्या सारखं रिंगण करुन मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
गुंडगिरी करणाऱ्यांची एसपी साहेबांनी नागडी धिंड काढायला हवी;जनतेची मागणी

लोकगर्जनान्यूज
बीड : परळी तालुक्यातील मारहाणीचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये एक टोळकं काठ्या आणि बेल्टने तूर बडवल्या सारखं रिंगण करून एकास अमानुष मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. तो जनावरा सारखं ओरडत असताना टोळके मारीत आहे. यामुळे राज्यात पुन्हा परळीची गुंडगिरी चेहरा उघडा पडला. हे रोखण्यासाठी एसपी साहेबांनी या गुंडगिरी करणाऱ्यांची नागडी धिंड काढावी अशी मागणी करण्यात येत आहे. यातील सात संशयित आरोपी पोलिसांनी रात्रीतून ताब्यात घेतले आहे. सततच काहींना काही प्रकार घडत असल्याने आभाळच फाटल्य कुठं कुठं ठिगळ लावू अशी अवस्था एसपी साहेबांची झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आवादा पवनचक्की कंपनीच्या वादातून हत्या झाली आणि बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचा क्रूर चेहरा राज्यात उघड झाला. हे प्रकरण राज्यातच नव्हे तर देशात गाजले, यानंतर बरेच प्रकार उघडकीस आले. काल शुक्रवारी पुन्हा परळी तालुक्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले झाला आहे. परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शिवराज हनुमान दिवटे याचे अपहरण करण्यात आले होते. शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरुन परतत होता. त्यावेळी त्याचे अपहरण झाले. यानंतर टोकवाडी शिवारातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली. दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओदेखील चित्रीत केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दहा ते बारा जणांचं टोळकं काठ्या आणि बेल्टने शिवराजला खाली पाडून ते तूर बडविल्यासारखे मारीत आहेत. या मारहाणीत तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसपी नवनीत कॉवत यांनी गंभीर दखल घेत रात्रीच गुन्हा दाखल करण आरोपींच्या शोधात पथके रवाना केली होती. रात्रीतून या प्रकरणी सात आरोपी अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या आरोपींमध्ये तीन वंजारी, एक मराठा, गोसावी, बौध्द अशा समाजाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या टोळीने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने त्यांची दहशत निर्माण करण्याचा उद्देश आहे अशी चर्चा सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाने यांची नागडी धिंड काढून पूर्ण परळी शहरातून फिरवावे अशी मागणी करण्यात येत आहे.