
केज : सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील लिंबागणेश येथे एका शेतात जुगार खेळणाऱ्या १४ जुगाऱ्यावर कारवाई करून त्यांच्याकडू २ लाख ९५ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या बाबतची माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका गुप्त बातमीदारा मार्फत अशी माहिती मिळाली की, नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबागणेश येथे शिवाजी शिंदे आणि मधुकर बांगर हे गोवर्धन वाणी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली जन्ना-मन्ना आणि अंदर बाहर नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहेत. ही माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेब बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भंडाणे आणि संजय टूले यांच्या पथकाने दि. २१ एप्रिल रोजी दुपारी ५:०० वा. च्या दरम्यान धाड टाकली. त्यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असे ४५ हजार २२० रु. तसेच ४ मोटार सायकली यांच्यासह एकूण २ लाख ९५ हजार २२० रु.चा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईत ४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून १० जुगारी पळून गेले.
पोलीस हेडकॉन्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून १४ जणांच्या विरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.