मा.खा. प्रितम मुंडे यांचा दौऱ्यानंतर ओन्ली मुंदडांची लाट

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील विविध गावांमध्ये काल सोमवारी माजी खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रचार दौरा केला. यावेळी विविध ठिकाणी बैठका घेऊन केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या दौऱ्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या भागात ओन्ली मुंदडांची लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
केज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मा. खासदार डॉ. प्रितम गोपीनाथरावजी मुंडे यांनी सोमवारी बनकारंजा, तांबवा, जिवाचीवाडी, येवता, शिंदी,विडा, कोरडेवाडी व दहीफळ या गावांना भेटी दिली. या भेटीदरम्यान गावातील तमाम मतदार बंधू-भगिनींशी विविध विषयांवर संवाद साधला. प्रितमताईंनी आपल्या प्रेरणादायक भाषणातून ग्रामस्थांना आमदार नमिता मुंदडा यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केलं. त्यांच्या विश्वासाने आणि सहकार्याने गावातील प्रत्येक व्यक्तीला एक नवा उत्साह मिळाला. या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर या भागात ओन्ली मुंदडांची लाट निर्माण झाली आहे. यावेळी उमेदवार नमिता मुंदडा यांच्या सह आजी-माजी सरपंच, ग्रा. सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.