अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा राष्ट्रीय पुरस्कार जी.बी.गदळे यांना जाहिर

केज : मुंबई येथील अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा राष्ट्रीय पुरस्कार केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव जी.बी.गदळे यांना जाहिर झाला असुन नुकतेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाई मोहाडीकर व कार्यकारी अध्यक्ष शामराव कराळे यांचे निवडीचे पञ प्राप्त झाले आहे.
हे पुरस्कार वितरण साने गुरुजी कथा मालेच्या वार्षिक अधिवेशन दि.28,29 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात जवाहर कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अणदुर ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद येथे होणार आहे.जी.बी.गदळे यांच्या शैक्षणिक ,सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेञातील योगदानाबद्धल हा पुरस्कार जाहिर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या च्या माध्यमातुनही त्यांनी बाल साहित्य संमेलन जवळबन व केज येथील मसापच्या मराठी साहित्य संमेलनात पुढाकार घेतला होता.माऊली विद्यालय जवळबन येथे मुख्याध्यापक म्हणुन काम करतांना ग्रामिण भागातील शैक्षणिक व सांस्कृतिक आलेख वाढविण्याचे काम ही त्यांनी केले होते. केज येथील छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेत काम करतांना त्यांनी आपल्या वैशिष्ट्येपुर्ण कामाचा ठसा उमटवला होता. मुख्याध्यापक पदावरुन सेवा निवृत्त झाल्या नंतर ही त्यांनी शैक्षणिक व सामाजिक काम सुरुच ठेवले हे विशेष होय. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणुन काम करतांना केज येथे सुसज्ज सांस्कृतिक सभागृह व्हावे या साठी आग्रही भुमिका घेतली आहे.
जी.बी.गदळे यांच्या या यशा बद्धल छञपती शिवाजी शिक्षण संस्था आडस चे सचिव रमेशराव आडसकर,जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे,दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब पापा देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.केज शहरातील विविध सामाजिक , शैक्षणिक ,साहित्यिक व पञकारीता या क्षेञातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.