एकाची एम.डी. तर दुसऱ्याची एम.बी.बी.एस साठी निवड झाल्याबद्दल माजी विध्यार्थ्यांचा शिक्षकांकडून सन्मान

लोकगर्जना न्यूज
धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली ही पुर्वी केज तालुक्यातील आडस केंद्रा अंतर्गत होती.खऱ्या अर्थाने या शाळेचा पाया सदाशिव थोरात यांनी निर्माण केला.७वी पर्यंत शाळा केली.त्यांच्याच कार्यकाळात महेबूब शेख,अनुरथ मुळे, असाहबोद्दीन शेख,बापुराव फुके, नितीन जाधव,छत्रभुज पांचाळ ईत्यादी शिक्षकांनी शाळेसाठी स्वतःला वाहुन घेतले. शाळेला गावाचा आधार मिळाला आणि गावाला शाळेचा अभिमान वाटु लागला.आडस,खोडस,कोळपिंपरी,तांडा,केकाणवाडी ईत्यादी गावातुन विद्यार्थी वाघोली येथे येत असत.त्या वेळी शाळेची विध्यार्थी संख्या २६५होती.शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा,समाज सहभाग ईत्यादी क्षेत्रात शाळेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
आज अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, त्या पैकी गिताजंली गणपती कोठुळे या विद्यार्थ्यांनीने १२वी पर्यंत कुठलीच शिकवणी लावली नाही,स्वयअध्ययनातूनच एम.बी. बी.एस.साठी निवड झाली.त्या नंतर तिने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एक वर्षे वैद्यकीय सेवा केली आहे तर एम.डी. साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे निवड झाली आहे,तिने पॅथॉलॉजी हा विषय घेतला आहे. युवराज अरुण गव्हाणे याची सांगली येथे एम.बी.बी एस.साठी निवड झाली आहे.
आज हे सर्व शिक्षक वेगवेगळ्या शाळेवर सेवा करत आहेत. परंतु आपले विद्यार्थी उच्च वैद्यकीय शिक्षण घेत आहेत
त्याचा अभिमान बाळगुन व त्यांना व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून नितीन जाधव यांनी कल्पना मांडली आणि त्याला सर्व शिक्षकांनी ओ दिला आणि शिवजयंतीचे औचित्य साधुन गीतांजली कोठुळे व युवराज गव्हाणे यांच्या घरी जाऊन शिवप्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनाही आपल्या गुरूंच्या हस्ते सत्कार स्विकारताना धन्य वाटले.
या समयी शेख महेबूब,मुळे अनुरथ,शेख असाहबोद्दीन,नितीन जाधव,बापुराव फुके,सरपंच राजेन्द्र गव्हाणे,मधुकर कोठुळे,अरुण गव्हाणे,गणपती कोठुळे इत्यादीची उपस्थिती होती.-