निराधारांना अनुदानापासुन वंचित ठेवणारे तहसिलदार वर कारवाई करा – शेख मन्सुर

गेवराई : तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचा वारंवार हिरमोड करण्यात येत आहे. मंजुर झालेल्या लाभार्थींना वर्षभरापासून आनुदान पासुन वंचित राहव लागत आहे.यामुळे संबधित आधिकाऱ्यांवर कारवाई करुन लाभार्थ्यांना आनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवा नेते तथा संजय गांधी समिती सदस्य शेख मन्सुर यांनी केले आहे.
संजय गांधी समिती सदस्य शेख मनसुर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. दिनांक १० डिसेंम्बर २०२० रोजी ९४ अर्ज मंजुर करण्यात आले होते, दुसरी -मिटिंग दिनांक १६ मार्च २०२१ रोजी ७४८ अर्ज मंजुर करण्यात आले तर, तीसरी मिटिंग दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी ४०५ अर्ज मंजुर करण्यात आले .१२४७ नविन लाभार्थी प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहे . त्याना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. सर्व मंजुर लाभार्थ्यांनी त्यांचे बॅक खाते पुस्तक व आधार कार्ड तहसिल कार्यालय गेवराई येथे जमा करण्यात आले आहे.तहसिल कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जी पणा मुळे त्यांना अनुदान मिळालेले नाही .संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काठोर कार्यवाही करण्यात यावी . तसेच कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे प्रस्ताव गेवराई तहसिल कार्यलयात धुळ खात पडलेले असुन त्याच्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही अर्जदार एक – एक वर्षापासुन अनुदानाची वाट पाहत आहे. तर लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा . व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे शेख मन्सुर यांनी केली आहे.