Black water काळे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर की, श्रीमंतीचे प्रदर्शन?

लोकगर्जनान्यूज
पाणी म्हणजे जीवन, जिवंत रहाण्यासाठी पाणी पाहिजेच पण यातही आता विविध प्रकार आले. प्रथम बाटली बंद मिनरल वॉटर आले. यानंतर घरा-घरात ॲक्वा फिल्टर आता चर्चा सुरू आहे काळे पाणी ( Black water ) ची नेमकं हे पाणी काय आहे? आपल्या साध्या पाण्यात आणि यामध्ये काय फरक आहे. हा खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे की, केवळ श्रीमंतीचे प्रदर्शन? सेलिब्रिटी का पितात काळे पाणी? त्यांचं अनुकरण म्हणून ब्लॅक वॉटरची चर्चा सुरू आहे.
भारत देश हा कृषीप्रधान व खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. शेतकरी म्हटले की, तो विहीर,नदीचे पाणी पिणारा कारण तहान लागली तर पाणी आवश्यक आहे. दुषित पाण्यामुळे कॉलरा, टायफाईड, काविळ असे काही साथ रोग फैलावतात असे समोर आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने म्हणजे कोळसा,वाळू, तुरटी याचा वापर करुन पाणी शुद्ध करण्यात येत असे. यात सुधारणा होऊन प्रथम बाटली बंद मिनरल वॉटर आले. यानंतर घरोघरी आरओ फिल्टर आले. आज गावागावात आर ओ फिल्टर पाण्याचे जार मिळत आहेत. हे सर्व समावेशक झाले आहे. परंतु सध्या चित्रपट सृष्टीतील नायक, नायिका, खेळाडू , गायक सह आदि ज्यांना सेलिब्रिटी म्हणून ओळखले जाते ते काळे पाणी ( Black water ) पित असल्याचे समोर आले आहे. अनेकवेळा आपण पाहातो की, अनेक सिने अभिनेत्री, क्रिकेटर बरेचशे जीमला जाताना या पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जातात. घरीही नियमित या काळ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो असे वृत्त असल्याने याची सध्या जोरदार चर्चा आहे. हे पाणी खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? या पाण्यामुळे पचनक्रिया चांगली होते, त्वचेवरील काळे डाग नाहीसे होऊन त्वचा तजेलदार होते, शरीरातील अनेक विषारी द्रव्ये बाहेर फेकले जाते, साध्या पाण्याच्या तुलनेत यात शरीरासाठी अधिक खनिजे मिळतात.शरिराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते असे अनेक दावे याबाबत केले जातात. यामुळे हे एक खास पाणी असल्याचे सांगितले जाते.
*चवीला कसे
ब्लॅक वॉटर ही चवीला आपल्या साध्या पाण्यासारखे असून, थोडीशी चव वेगळी वाटते असा दाव आहे. त्याचा रंग हा कोला या शीतपेये प्रमाणे असल्याने त्यास काळे पाणी ( Black water ) म्हटले जाते.
* दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
Black water काळ्या पाण्याचा दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून, तो प्रति लिटर २०० रु. असा आहे. यास आपण ऑनलाइन पद्धतीने मागवू शकतो. ५०० मिली ६ बाटल्यांचा पॅक ५५० ते ६०० रुपयांना मिळतो. प्रति लिटर २०० हे पाणी सेलिब्रिटीच पिऊ शकतात.