नातवाने मुलगी पळवून नेली अन् मुलीच्या नातलगांकडून आज्जीला भयानक शिक्षा

लोकगर्जनान्यूज
औरंगाबाद : नातवाने मुलगी पळवून नेल्याच्या रागातून मुलीच्या नातलगांनी मुलगी कुठे आहे म्हणून मुलाच्या आज्जीला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर तालुक्यात उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील एका गावातील तरुणाने १ डिसेंबरला मुलीला पळवून नेले आहे. तेंव्हा पासून नातलग सदरील मुलीचा शोध घेत आहेत. शोध घेत असताना तिघांनी मुलाच्या घरी जाऊन वृध्द आज्जीला तुझा नातू व आमची मुलगी कुठे आहे. असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वृध्द आज्जी मला माहित नाही मारु नका म्हणून विनवणी करत होती. परंतु त्याच ऐकून न घेता बेदम मारहाण केली. यानंतर विवस्त्र करुन मारहाण करत मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग केली. आरडाओरडा ऐकून बाजुच्या वस्तीवरील लोक धावून येत असल्याचे पाहून मारहाण करणाऱ्यांनी धुम ठोकली. सदरील घटना दोन दिवसांपूर्वी घडलेली असून याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपींमध्ये दोन पुरुष व एक महिला आहे. तिन्ही आरोपी फरार असून पोलीस शोध घेत असल्याचे मटाने वृत्त दिले आहे.