धारुर घाटाने घेतला आणखी एक बळी; सकाळी झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू

लोकगर्जना न्यूज
आज सकाळी धारुर घाटात सिमेंटचा ट्रक पलटी होऊन घडलेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता. त्या चालकाचा दवाखान्यात जाण्याअगोदर मृत्यू झाला. दवाखान्यात पोचताच डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे सांगितले.
आज सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास धारूर घाटात माजलगाव येथे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला होता. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात घेऊन गेले. दवाखान्यात पोचताच डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे सांगितले. रस्त्यातच मृत्यू झाल्याचे अंदाज आहे. उमपुरे मुस्तफा रा. उमरगा असे मयत ट्रक चालकाचे नाव असल्याचे समोर येत आहे. धारुर घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आणखी किती मृत्यू होण्याची गरज आहे असा संतप्त सवाल उपस्थित करत या घाटाचे रूंदीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.