क्राईम
धारुर-केज रस्त्यावर ट्रक व ट्रॅक्टरचा अपघात

लोकगर्जनान्यूज
केज : ऊसाचा ट्रॅक्टर व सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकचा रात्री अपघात झाला असून यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात नेमका कसा घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोयाबीन भरुन जात असलेले ट्रक आणि ऊस घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरचा धारुर-केज रस्त्यावर कासारी पाटी ते तांबवा दरम्यान अपघात झाला. ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडला असून ट्रक रस्त्यावर अडवा झाला आहे. यामुळे सध्या अर्धाच रस्ता वाहतूकीसाठी खुला आहे. शनिवारी रात्री अपघात झाल्याची माहिती मिळाली असून वेळ व अपघात कसा घडला हे समजु शकले नाही. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु समाधानाची बाब म्हणजे यात जिवितहानी झाली नाही. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने दिली.