धनंजय मुंडे यांना खंडणी मागणारी ‘ती’ पोलीसांनी केली जेरबंद

लोकगर्जना न्यूज
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना विदेशी नंबर वरुन फोन, मेसेज करुन खंडणी मागणारी ‘ती’ महाराष्ट्र व इंदौर पोलीसांनी संयुक्त कारवाई करुन जेरबंदी केली असून, इंदौर कोर्टात हजर करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस आता ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या खंडणी मागणीची घटना उघडकीस येताच राज्यात एकच खळबळ माजली आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मलबार हिल, मुंबई पोलीसात तक्रार दाखल केली होती. यानंतर या चर्चेला राज्यात उधाण आले. प्रत्येक जण ‘ती’ कोण? अशी चर्चा करत होते. तब्बल १० कोटीची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले असून, ५ कोटी रोख व ५ कोटींचे दुकान अशी मागणी केली होती. सदरील महिला बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत खंडणी मागत होती. याचा तपास गुन्हे शाखेकडे येताच त्यांनी याचा छडा लावत सदरील महिला इंदौरची असल्याने निष्पन्न झाले. इंदौर व महाराष्ट्र पोलीसांनी संयुक्त कारवाई करत सदरील महिलेला जेरबंद केले असून, रेणू शर्मा असे तीचे नाव असल्याचे वृत्त आहे.
रेणू शर्मा आहे तरी कोण?
रेणू शर्मा ही करुणा शर्मांची बहीण असून, गतवर्षी याच रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली होती. काही दिवसांत परत ही घेतली होती. तेव्हा पासून ती विदेशी नंबर वापरत असून त्यावरुन मेसेज व फोन करून खंडणीची मागणी करत होती.