दहावी, बारावी ( SSC-HSC ) बोर्डाच्या परीक्षा काळात अशी काळजी घ्या

लोकगर्जनान्यूज
बीड : दहावी, बारावी ( SSC-HSC ) बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे विद्यार्थी अंग झाडून अभ्यासाला लागले आहेत. तरीही मनात भीती असते, ताण येतो परंतु विद्यार्थ्यांनी ताण न घेता परीक्षा काळात काही पथ्य पाळले व काळजी घेतली तर यश कोणीही रोखू शकणार नाही. काय? काळजी घ्यावी यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.
दहावी, बारावी ( SSC-HSC ) बोर्ड परीक्षांना खूप महत्त्व आहे. दहावी ( ( SSC ) बोर्ड नंतर विद्यार्थी माध्यमिक शिक्षणातून उच्च माध्यमिक मध्ये जातो. यानंतर बारावी ( HSC ) परीक्षा पास केली तर पुढील उच्च शिक्षणाचे दारं उघडतात. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला या दोन्ही बोर्ड परीक्षांचा ताण येतो. परीक्षा जवळ येईल तसं यात वाढ होत जाते. यामुळे वर्षभर केलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वेळा घाबरून गेल्यानंतर ज्ञात असणारी गोष्ट, एखाद्या प्रश्नाचे पाठ असलेले उत्तर आठवत नाही. पेपर संपल्यावर आपण थोडे निवांत झालो की, हे येत होते ते येत होतं असं होतं. या दरम्यान विद्यार्थ्यांनी काही पथ्य पाळले तर परीक्षा सुरळीत पार पडतील. यावर्षी या फेब्रुवारी महिन्याच्या २१ तारखेपासून १२ वी ( HSC ) च्या परीक्षा सुरू होणार असून २१ मार्च पर्यंत सुरू रहातील. तसेच इयत्ता १० वी ( SSC ) परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या काळात होणार आहेत. काही दिवसांवर परीक्षा आल्याने विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. सध्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व देणं आवश्यक आहे. तसेच सराव करण्यासाठी प्रश्न पत्रिका सोडवणे, शिक्षकांशी संपर्क करुन संभाव्य प्रश्न विचारुन घेत त्यांची उत्तरांचा अभ्यास करावा. प्रत्येक्ष परीक्षेच्या काळात रात्र-रात्र अभ्यास न करता चांगली ६ ते ८ तास झोप घ्यावी, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे शक्य झाले तर सकाळच्या वातावरणात फिरुन यावं यामुळे प्रसन्न वाटेल. परीक्षा केंद्रांचा भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करुन वेळे आधी आपण पोहचू अशा बेतानेच घरातून बाहेर पडायला हवं. तसेच एकस्ट्रा पेन, सिसपेन्सील, कंपास आदि साहित्य सोबत असावं. शक्य झालं तर परीक्षेच्या पहिल्या दिवशी आपण परीक्षा केंद्रात जाऊन आपलं बैठक क्रमांक कोणत्या हॉलमध्ये आला खात्री करावी, परीक्षेला जाताना मोबाईल, स्मार्ट वॉच, कच्च लिहिलेली चिठ्ठी, पुस्तक, या वस्तू नेऊ नये. परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पोचावे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आधी अन् वेळ संपण्याआधी १० मिनिटं आगोदर इशाऱ्याचे टोल ( घंटा ) वाजलं, उत्तर पत्रिकेवर आपलं बैठक क्रमांक सांगितलेल्या रकान्यात लिहावं, इतर ठिकाणी बैठक क्रमांक अथवा आपली ओळख पटेल असं काही लिहू नये, अन्यथा परीक्षार्थ्याची संपादणूक रद्द समजण्यात येईल. या सर्व सूचना आपल्याला हॉल तिकिटावर व उत्तर पत्रिकावर पहाता येईल. तसेच पर्यवेक्षक यांनी प्रश्न पत्रिका देताच ती आधी पुर्ण वाचावी तसेच गळालेल्या ( रिकाम्या ) जागा भरुन घेणे, एक वाक्यात उत्तरे हे प्रश्न आधी सोडवावेत. मोठे प्रश्न नंतर सोडवावेत. अशा तऱ्हेने नियोजन केले तर बोर्ड परीक्षांचा ( Board Exam ) ताण येणार नाही. यासह आपल्या शिक्षकांशी याबाबत चर्चा करुन त्यांच्या सूचनांचे पालन करावे.