आपला जिल्हा

‘तो’  बिबट्या नव्हे तर… ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास केज तालुक्यातील या भागात आढळला होता….

 

केज :-१ जानेवारी रात्री ७:०० वा. केज तालुक्यातील साळेगाव परिसरात बिबट्या सारखा दिसणारा प्राणी प्रवाशांच्या दृष्टीस पडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘तो’ प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे सांगितले.

शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान नांदूर येथील ढाकणे हे मांगवडगाव कडे जात असताना त्यांना साळेगाव ( ता. केज ) जवळ चिंचोली माळी रस्त्यावरील दस्तगीर माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातून जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या सारखा प्राणी आढळून आला.हा प्राणी नंतर युवराज बुदगुडे यांच्या उसाच्या शेतात काटेरी तारांच्या कुंपणातून आत गेला. माहिती ढाकणे यांनी गावातील सरपंच कैलास जाधव व उपसरपंच अमर मुळे यांना दिली. गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. दि. २ रविवारी सकाळी ९:वा. धारूर वन विभागाचे परिक्षेत्राधिकारी यु. एच. चिकटे, वन परिमंडळ धारूरचे एस. जी. वरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक साळेगाव येथे आले. या पथकात वनरक्षक श्रीमती सारिका मोराळे, वनरक्षक संभाजी पारवे, वचिष्ठ भालेराव आणि चालक शाम गायसमुद्रे हे होते. त्यांच्या सोबत सरपंच कैलास जाधव पाटील उपसरपंच अमर मुळे आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता; शेतात आढळलेल्या पावलाच्या ठशा वरून ते ठसे हे बिबट्याचे नव्हे तर तरसाचे असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. तसेच तरसा पासून मानव आणि पाळीव प्राण्यांना धोका नसून तरस हे कुत्र्यावर हल्ला करून त्यांना भक्ष्य करीत असतो अशी माहिती त्यांनी दिली. बिबट्याच्या चर्चेमुळे दहशतीखाली असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »