तरुण शेतकऱ्यांसाठी म्हत्वाची बातमी कूकुट पालन, शेळी पालन, गायी म्हशी साठी अर्ज भरणे सुरू

लोकगर्जनान्युज
बीड : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शेती सोबत जोड धंदा करण्याच्या विचारात असलेल्या तरुण शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळी,मेंडी गट वाटप, कुक्कुट पालन यांसारख्या योजनांसाठी अर्ज करावेत.
या योजनेसाठी अर्ज या https://ah.mahabms.com संकेतस्थळ, मोबाईल ॲप AH-MAHABMS व टोल फ्रि क्रमांक 1962 देण्यात आला आहे. तरी पशुपालक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी 2 जून 2025 पर्यत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावे, नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई व म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.