राजकारण

जिल्हापरिषदेसाठी कसे पडले आरक्षण?

बीड: बीड जिल्हा परिषदेच्या ६९ जागांसाठिची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एससी ८, एसटी १, ओबीसी १८ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच्या २१ जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत झाली.
यात आरक्षीत गट असे आहेत
एससी: उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. त्यापैकी उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव हे पाच गट एससी महिलांसाठी राखीव झाले.
एसटी: जिरेवाडी
ओबीसी: रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव,पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव,मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. यापैकी रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही,नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री,जोगाईवाडी हे ९ गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.
सर्वसाधारण महिला
ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी,टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी , नागापूर या गटांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »